संचालक मंडळाचा अहवाल
सन्माननीय बंधु आणि भगिनो,
आपण सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या 13 व्या वार्षिक सर्व साधारण सभेस उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले स्वागत करतो. तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा अहवाल, नफा तोटा पत्रक व ताळेबंद आपणापुढे सादर करीत आहे.
कार्यक्षेत्र:-
संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्य.
सभासद व भाग भांडवल:-
दिनांक 31/03/2023 वरील एकूण सभासद 59444 मध्ये सन 2023-24 या नवीन आर्थिक वर्षात 5423 ने वाढ होवून 31/03/2024 वर सभासद संख्या 64867 इतकी आहे.
तसेच दिनांक 31/03/2023 वर वसूल भाग भांडवल रु. 4,07,04,800.00 मध्ये सन 2023-24 या आर्थिक वर्षात रु.1,31,04,400.00 भागभांडवल जमा झाले आहे. व सन 2023-24 मध्ये रु.88,300.00 भाग भांडवल परत केले आहे. दिनांक 31/03/2024 वर वसूल झालेले एकूण भागभांडवल रु.5,37,20,900.00 इतके आहे.
राखीव व इतर निधी:-
संस्थेचा आरंभी राखीव निधी एकूण रु.3,02,29,181.06 व इतर निधी रु.15,18,45,402.00 असे एकूण निधी रु.18,20,74,583.06 होते. अहवाल सालात राखीव निधी मध्ये रु.2,15,58,550.84 ने वाढ होवून संस्थेचे दिनांक 31 मार्च 2024 वर एकूण राखीव निधी रु.5,17,87,731.90 इतका आहे. 31 मार्च 2023 वरील इतर एकूण निधी रु. रु.15,18,45,402.00 मध्ये अहवाल सालात रु.2,43,28,820.60 ने वाढ होवून 31 मार्च 2024 वर एकूण इतर निधी रु.17,61,74,222.60 इतके आहे. दिनांक 31/03/2024 वर राखीव व इतर निधी रु.22,79,61,954.50 इतका आहे.
ठेवी:-
दिनांक 31/03/2023 वर एकूण ठेवी रु.1,97,16,09,605.41 इतक्या होत्या. अहवाल सालात एकूण ठेवीमध्ये रु.38,78,48,706.47 ने वाढ होवून दिनांक 31/03/2024 अखेर एकूण ठेवी रु.2,35,94,58,311.88 इतक्या आहेत.
कर्जे:-
दिनांक 31/03/2023 वर एकूण कर्जे रु.2,07,64,95,798.75 इतकी होती. दिनांक 31/03/2024 वर कर्ज येणे बाकी रु.1,99,87,59,468.64 इतकी आहेत.
गुंतवणूक:-
दिनांक 31/03/2023 वर रु.3,70,21,296.00 इतकी होती. अहवाल सालात एकूण गुंतवणुकीममध्ये रु.52,71,92,754.00 ने वाढ होवून दिनांक 31/03/2024 वर एकूण गुंतवणुक रु.56,42,14,050.00 इतकी आहे.
प्रशिक्षण:
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणामध्ये त्यांची कर्तव्ये व जबाबदारी, त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता वाढीसाठी सतत अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. मुख्यालयाचे प्रशिक्षण विभागामार्फत कॉम्प्युटर व माहिती तंत्रज्ञान अनुषंगाने, कर्मचाऱ्यांवर सोपविलेले कामकाज आणि जबाबदारीचा सतत आढावा घेतला जातो. अहवाल सालात नॅशनल सहकारी संघ, नवी दिल्ली आयोजीत नेतृत्व विकास कार्यक्रम, संदर्भात आयोजीत प्रशिक्षणास संस्थेचे संचालक, मॅक्स मास्टर कंन्सलटंन्सी, सॅपक्ट कंन्सलटंन्सी आयोजीत मल्टीस्टेट अमेंडमेंट ॲक्ट 2023 व सोनेजारण कर्जवाटप प्रशिक्षणास संस्थेचे कर्मचारी संचालक यांना पाठवण्यात आले होते. तसेच संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांचे कामकाजामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीसे वेळोवेळी प्रशिक्षण आयोजीत केले होते.
मनुष्यबळ विकास:-
संस्थेने कर्मचाऱ्यांचे हित, आर्थिक संरक्षण या बाबींचा विचार करुन मनुष्यबळ विकास समितीची स्थापना केलेली आहे. भविष्य निर्वाह निधीचे अंमलबजावणी सोबतच कर्मचाऱ्यांची प्रत्येकी रु.5.00 लाखांची पर्सनल ॲक्सीडेन्ट ग्रुप इन्शुअरन्स पॉलिसी घेण्यात आलेली आहे. तसेच आकस्मिक आर्थिक अडचणी/औषधोपचार इ. कारणासाठी पगारापोटी अत्यल्प व्याज दरात कर्ज सुविधा उपलब्ध केलेली आहे. कर्मचाऱ्यासाठी सेवा नियम लागू केले आहेत.
माहिती व तंत्रज्ञान :-
संस्थेने सुरुवातीपासूनच सर्व प्रकारचे बँकींग स्वरुपाचे व्यवहारासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन व्यवहार कॉम्प्युटराइजड् केलेले आहेत. तसेच वेळोवेळी माहिती व तंत्रज्ञानातील सुधारित प्रणालीचा अवलंब करुन ग्राहक, खातेदारांना तत्पर व सुलभ सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच कर्मचारी हजेरी, पगारपत्रक, रजा व भविष्यनिर्वाह निधी याचे कामकाज सुरळीत व अचुक होण्यासाठी संस्थेने इंन्फोगीर्ड प्रा.लि. या कंपनीकडून पेरोल सॉफटवेअर घेतले आहे.
संस्थेच्या सभासदांना विनाशुल्क पुरविल्या जाणाऱ्या सेवा सुविधा:
कोअर बँकींग
मोबाईल ॲप
विनाशुल्क आरटीजीएस/एनईएफटी
आरटीजीएस/एनईएफटी द्वारा विनाशुल्क इनकमिंग फंड्स कलेक्शन
एसएमएस अलर्ट सुविधा
क्युआर कोडद्वारे फंड कलेक्शन
इन्फिना इन्शुअरन्स ब्रोकींग प्रा.लि.मुंबई द्वारे कमी प्रिमीयमवर इन्शुअरन्स (जनावरे, वाहन इत्यादी)
संस्थेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सातत्याने तांत्रिक सुधारणा करण्याच्यादृष्टीने पुढाकार घेण्यात येतो. तांत्रिक सुधारणामुळे संस्थेच्या दैनंदिन कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत झालेली आहे. संस्थेने नव-नवीन वापरात येणाऱ्या सुलभतेच्या दृष्टीने उपयुक्त प्रणालीचे तंत्रज्ञान स्वीकारलेले असून त्याचा संस्थेच्या ग्राहकांना फायदा होत आहे.
ऑडिट :-
संस्थेचे कार्यालयीन कामकाजासंबंधीचे रेकॉर्ड अद्ययावत व अचून ठेवणे, नियमानुसार आर्थिक व्यवहार व वैधानिक स्वरुपाचे ठेवावयाचे रेकॉर्ड या पूर्ततेसाठी इन्टर्नल ऑडिट उपयुक्त असते. वेळीच व्यवस्थापनास कायदेशीर पूर्तता व धोक्याचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते. इन्टर्नल ऑडिटर्स म्हणून नियुक्त केलेल्या मे.शिंदे चव्हाण गांधी ॲण्ड कं.सी.ए.धाराशिव यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चे लेखापरिक्षण पूर्ण केलेले आहे. संस्थेचे आर्थिक वर्ष 2023-24 चे “वैधानिक लेखापरिक्षण” मे.पवार कुलकर्णी ॲन्ड असो., चार्टर्ड अकौंटंट्स, सांगली यांनी पूर्ण केलेले आहे. संस्थेस “अ” वर्ग मिळालेला आहे.
मिटींग :-
संचालक मंडळ व अन्य समित्या व उपसमितीच्या सभा नियमित होतात. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संचालक मंडळाच्या 11, कार्यकारी समितीच्या 7, कर्ज व वसुली समितीच्या 9 व मनुष्यबळ, खरेदी व लेखापरिक्षण समितीच्या 6 अशा एकूण 33 सभा झालेल्या आहेत.
नफा विभागणी:-
1) मागील सन 2022-23 वरील शिल्लक नफा रु.9,15,206.06 सन 2023-24 मध्ये ढोबळ नफा रु.7,39,68,916.91 असा एकूण नफा रु.7,48,84,122.91 इतका झाला आहे. सदर ढोबळ नफ्यातून संचालक मंडळ सभा दि.27/04/2024 मधील ठराव क्र.07 अन्वये शासकीय तरतुदी विचारात घेवून खालीलप्रमाणे तरतुदी करण्यात आलेल्या असून त्यास वार्षिक सर्व साधारण सभेस शिफारस करावी असे ठरले आहे.
नफा विभागणी 2023-24
अ.क्र. — तपशील — रक्कम रु.
मागील शिल्लक नफा – 915206.00
चालू नफा – 73968916.91
एकूण नफा – 74884122.91
1 उपविधी क्र.54(i) प्रमाणे 25 % रिझर्व्ह फंड – 18721031.00
2 मल्टीस्टेट अमेंन्डमेंट अॅक्ट 2023 नुसार 1 टक्के शिक्षण निधी – 748842.00
3 मल्टीस्टेट अमेंन्डमेंट अॅक्ट 2023 नुसार 1 टक्के पुनर्वसन निधी- 748842.00
4 उपविधी क्र.54(iii) प्रमाणे 10 % स्थैर्य निधी (कर्ज अथवा आकस्मिक नुकसानी पोटी) – 7488413.00
5 उपविधी क्र. 55(i) प्रमाणे 10 % बिल्डींग फंड – 7488413.00
6 उपविधी क्र.55 (एफ) प्रमाणे 5 % संशयीत व बुडीत कर्ज निधी – 3744206.00
7 लाभांष समीकरण निधी 5 % – 3744206.00
8 सानुग्रह अनुदान – 1500000.00
9 निवडणूक निधी – 500000.00
एकूण – 44683953.00
2) सन 2023-24 मधील नफा रु.30200170.00 मधुन खालीलप्रमाणे नफा वाटणी करणेबाबत संचालक मंडळाने शिफारस कली आहे.
शिल्लक नफा
30200170.00
1 उपविधी क्र.55 (ए) प्रमाणे 13 % लाभांष – 6962725.00
2 शिल्लक नफा रिझर्व्ह फंडास वर्ग – 22500000.00
पुढे ओढलेला नफा – 737445.00
लाभांष:-
दिनांक 31/03/024 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी संचालक मंडळाने 13 टक्के लाभांष जाहीर करुन आपले मंजुरीस्तव शिफारस केलेली आहे.
संस्थेच्या सभासदांनी संस्थेचे जादा शेअर्स घेवून लाभांषाचा फायदा घ्यावा असे मी आवाहन करतो.
आभार:
अहवाल सालात सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांनी दिलेल्या सहकार्यामुळे 31/03/2024 वर संस्थेच्या आर्थिक व्यवहारात समाधानकारक वाढ होवून नफ्यातही मोठी वाढ झालेली आहे याची खास नोंद घेण्याची संधी संचालक मंडळास मिळाली आहे. त्यासाठी संचालक मंडळ, आपणा सर्वांचे आभारी आहे. अहवाल सालात विविध शासकीय अधिकाऱ्यांकडून संस्थेच्या कामकाजात कायदेशीर पूर्ततेच्या दृष्टीने मार्गदर्शन व सहकार्य मिळालेले आहे. प्रामुख्याने मा.सेंट्रल रजिष्ट्रार, सहकार विभाग नवी दिल्ली, मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धाराशिव संस्थेचे अंतर्गत व वैधानिक लेखापरिक्षक, डॉ.आंबेडकर कारखाना, विविध सहकारी पतसंस्था यांचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार.
तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पित भावनेने अहवाल सालात संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये लक्षणीय वाढीसाठी विधायक सहभाग नोंदवून प्रयत्न व कामकाज केले त्या बद्दल त्यांना धन्यवाद.
जय सहकार, जय हिंद, जय महाराष्ट्र
आपला स्नेहांकित
ॲड.चित्राव अ.गोरे
अध्यक्ष